You are currently viewing निर्भय बनो चळवळीच्या विरोधात मनसे आक्रमक…

निर्भय बनो चळवळीच्या विरोधात मनसे आक्रमक…

निर्भय बनो चळवळीच्या विरोधात मनसे आक्रमक…

निवडणूक आयोगाकडे तक्रार; राष्ट्रविरोधी भाषणे केल्याचा आरोप…

कुडाळ

अराजकीय सभा असल्याचे सांगून “निर्भय बनो” या चळवळीच्या नावाखाली राष्ट्रविरोधी भाषणे करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्या सभेत विशिष्ट नेत्याविषयी मतप्रवाह दूषित व्हावा या उद्देशाने भाषणे केली जात आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रात दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, सभांमध्ये वक्ते आयोजनाचा खर्च, विविध परवानग्या याविषयी शहानिशा करावी, निवडणुक प्रक्रियेप्रमाणे व्हीडीओ शुटींग करावे. राजकीय संदर्भातील भाषणे किंवा मतदान संबंधित वक्तव्ये केल्यास प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा