You are currently viewing तुळस येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…

तुळस येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…

तुळस येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद…

वेंगुर्ले

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वैच्छीक सेवा आणि सशक्तीकरण कार्यक्रम’ अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्याचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३३ जणांनी रक्तदान केले. वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस चे हे सलग २०वे रक्तदान शिबिर होते. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तुळस गावच्या सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच शंकर घारे, उपसरपंच सचिन नाईक, ग्रा. प.सदस्य जयवंत तुळसकर, सदस्या चरित्रा परब,रतन कबरे,अपर्णा गावडे, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान चे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो, श्रीकृष्ण कोंडूस्कर,राजेश पेडणेकर,पत्रकार संजय पिळनकर, महेश राऊळ, सुजाता पडवळ, प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर , वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित आळवे, लाईफ ओके पलतडचे बाबली शेटकर, महेश अरोसकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर रक्तदान शिबिरासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला आणि लाईफ ओके पलतड यांचे सहयोगी संस्था म्हणुन सहकार्य लाभले.

यावेळी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. अमित आळवे यांनी प्रतिष्ठानच्या रक्तदान आणि सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत सलग २० वे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल कौतुक केले. दुर्मिळ रक्तदात्यानी अशा शिबिरामधून रक्तदान करावे असे आवाहन केले. सरपंच रश्मी परब यांनी रक्तदान चे महत्व विषद करताना रक्तदान चळवळ सातत्याने राबवत असल्याबद्दल आयोजक संस्थांचे ऋण व्यक्त केले. माजी सरपंच शंकर घारे आणि पत्रकार संजय पिळणकर यांनी रक्तदान उपक्रमाचे कौतुक करीत रक्तदाते यांना शुभेच्छा दिल्या. शिबीर यशस्वी नियोजनासाठी माधव तुळसकर, मंगेश सावंत, सद्गुरु सावंत, राजू परुळकर, प्रांजल सावंत, वैष्णवी परुळकर, अक्षता गावडे, हेमलता राऊळ, रोहन राऊळ, सदाशिव सावंत, सागर सावंत, कृष्णा सावंत, निखिल ढोले, ओंकार राऊळ, प्रसाद भणगे यांनी मेहनत घेतली.रक्तदात्यांचे चंदनाचे रोप देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन परुळकर तर आभार गुरुदास तिरोडकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा