जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ताडपत्री चे वाटप

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ताडपत्री चे वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.
अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शेतकऱ्यांना राष्ट्रवादी च्या माध्यमातून जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते ताडपत्री चे वाटप करण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष राजू पावसकर, युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग, कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर, कणकवली विधानसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळकर, उत्तम तेली, संतोष तेली, अशोक पवार, स्नेहा सावंत, मारुती पवार, संतोष चव्हाण, संतोष सावंत, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अमित सामंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांना निरोगी व दीर्घायुष्य आयुष्य लाभो अशी आई कुर्ला देवीचरणी प्रार्थना करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा