You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशनचे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन

उज्जैनकर फाउंडेशनचे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन

3 ते 4 ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथे होणार संपन्न..!

बुलडाणा:(बबनराव आराख) शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि. जळगावचे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज साहित्य नगरी व आदिशक्ती संत मुक्ताई व्यासपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे 3 व 4 ऑक्टोबर रोजी दोन दिवशीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे मराठी भाषा प्रचार व प्रचारासाठी गेल्या 16 वर्षांपासून अखंड कार्य करत आहे. असे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

संमेलनाचे उद्घाटक महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक तथा फाउंडेशनचे राज्य राज्याध्यक्ष छत्रपती संभाजी नगर येथील प्रा.डॉ.सुभाष बागल तर या संमेलनाचे कार्याध्यक्ष नाशिक येथील कार्यकारी अध्यक्ष आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक येथील श्री शिवानंद महाराज या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ.त्रिवेणी तुंगार संमेलनाचे संयोजक नाशिक येथील सुप्रसिद्ध कृषी तज्ञ तथा उद्योजक श्री बुधाजीराव पानसरे संमेलनाचे सह कार्याध्यक्ष तथा उज्जैनकर फाउंडेशनचे राष्ट्रीय आर्थिक सल्लागार, अहिल्यानगर येथील आचार्य डॉ.शंकर अंदानी संमेलनाचे सह संयोजक कार्याध्यक्ष विदर्भ सहयोग मंडळ, पुणे येथील श्री शालिग्राम तायडे निमंत्रक युनियन अध्यक्ष जे.एस.डब्ल्यू.जे एफ.इ.इलेक्ट्रिकल कंपनी नाशिकचे श्री विलास पाटील संमेलनाच्या सह निमंत्रक तथा त्रंबक नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.संध्या विलास देवरे त्याचप्रमाणे या संमेलनाला पुढील मान्यवर महोदय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे त्यामध्ये केंद्रीय क्रीडा व युवा राज्यमंत्री, भारत सरकार खासदार रक्षाताई खडसे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल तथा कृषिमंत्री आमदार श्री एकनाथराव खडसे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीशभाऊ महाजन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादासाहेब भुसे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे जनार्दन स्वामी आश्रम, त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य शांतिगिरी महाराज विधान परिषद देचे माजी आमदार डॉ.सुधीरजी तांबे नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सौ.सीमाताई हिरे महिला विकास आर्थिक महामंडळाच्या माजी अध्यक्षा तथा उज्जैनकर फाउंडेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मुंबई येथील डॉ.सौ.ज्योतीताई ठाकरे मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार श्री चंद्रकांतभाऊ पाटील पर्यटन विभाग नाशिकचे उप संचालक डॉ. नंदकुमार राऊत नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ.सौ.संगीता नांदुरकर संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर चे विश्वस्त तथा माजी अध्यक्ष अँड सोमनाथ घोटेकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे सेक्रेटरी तथा जळगाव जिल्ह्याचे शिक्षक नेते श्री शालिग्राम भिरुड तथा उज्जैनकर फाउंडेशनचे विविध जिल्हा, विविध विभाग, राज्य कार्यकारणी तथा राष्ट्रीय कार्यकारिणीचे विविध पदाधिकारी तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, गुजरात येथील फाउंडेशनचे विविध पदाधिकारी साहित्यिक, रसिक या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा