You are currently viewing तळवडे येथे शेतकरी व बागायतदार यांचा मेळावा उत्साहात संपन्न..

तळवडे येथे शेतकरी व बागायतदार यांचा मेळावा उत्साहात संपन्न..

सावंतवाडी :

सहयोग ग्रामविकास मंडळ गरड माजगाव व तळवडे ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने तळवडे येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व शेतकरी बागायतदार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन राणी श्रीमंत सौ. शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मेळाव्याला भेट देऊन उपस्थित शेतकरी बागायतदारांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी शेतकरी मेळाव्यात “शेतकरी व बागायतदारांनी आपल्या आर्थिक आणि सर्वांगिण विकासासाठी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे आणि त्याबद्दल योग्य ती माहिती घ्यावी आणि आपले उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,” असे मत डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, कोकण कृषी विद्यापीठ संचालक प्रमोद सावंत, तळवडे शिक्षण मंडळाचे बाळा पेडणेकर, सरपंच तळवडे विनिता मेस्त्री, उपसरपंच प्राजक्ता गावडे, प्राचार्य डी. एस. भारमाल, एम कुलकर्णी, कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे, सहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव अध्यक्ष दिलीप गोडकर, सचिव मोतीराम टोपले, खजिनदार हनुमंत देसाई तसेच तळवडे श्री जनता विद्यालय प्राचार्य प्रतापराव देसाई, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, माजी सभापती पंकज पेडणेकर, रवींद्र परब, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नेमळे कौल कारखाना अध्यक्ष राऊळ, बाळा जाधव, राजाराम गावडे, बंड्या परब, कुंदा पै, दादा परब, विजय नाईक आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + sixteen =