You are currently viewing वराड कावळेवाडी येथे 26 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर

वराड कावळेवाडी येथे 26 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर

मालवण :

 

सहकार महर्षी कै प्रा. डी. बी. ढोलम यांच्या स्मृती प्रित्यर्थ आभाळमाया ग्रुप आणि जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील शिबिर सहकार महर्षी काय प्रा डी बी ढोलम यांच्या निवासस्थानी वराड कावळेवाडी येथे पार पडणार आहे. या शिबिरासाठी गोवा बांबुळी हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग एस एस पी एम रुग्णालय पडवे त्यांचे सहकार्य लाभणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या मित्र परिवारासहित उपस्थित राहून रक्तदानाचे महान कार्य पार पाडावे. दरवर्षी आभाळमाया ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडले जातात. महा रक्तदान शिबिर भरविले जाते याही वर्षी रक्तदात्यांनी सहभागी व्हावे तसेच आमच्या सामाजिक कार्यास मोलाचा हातभार लावावा असे आवाहन आभाळमाया ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा