You are currently viewing कृष्ण कन्हैया

कृष्ण कन्हैया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्रावण रंग..

*कृष्ण कन्हैया..* 

 

मेघा बरसे बरसे

कधी झड कधी रिमझिम

क्षणात येतसे कधी

सोन किरणे झिमझिम…

 

आली श्रावण अष्टमी

कृष्णजन्माचीच वेळा

परमात्म्याचा जन्म

नभी दिसे श्रावण कळा..

 

गोवर्धन उचलला

गोपींसंगे रास खेळला

गाई गुरे राखताना

गोपांसह चेंडू झेलला..

 

केले द्वारकेचे राज्य

रुक्मिणी देवी पट्टराणी

बंदीवासातून मुक्त केल्या

सोळा सहस्त्र रमणी..

 

वर्णू श्रीकृष्ण किमया

शब्द अपुरे पडती

भगवंताची कीर्ती गाता

होई गुंग माझी मती…

 

उज्ज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा