You are currently viewing एसआयआर अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष

एसआयआर अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष

सांगली / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत नागरिकांनी आपले नाव असल्याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

सदरची प्रारूप यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालय व सर्व पदनिर्देशित ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन मतदार नोंदणी करावी. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल आणि मतदार यादीमध्ये दुरुस्ती देखील करुन घेता येईल.

मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा