You are currently viewing कळसुली ग्रामपंचायतीत रंगला “खेळ पैठणीचा”

कळसुली ग्रामपंचायतीत रंगला “खेळ पैठणीचा”

प्रथम पैठणीचा मान सौ. शुभदा (भारती) देसाई यांना; द्वितीय क्रमांक सेमी पैठणीच्या मानकरी सौ. शोभा गावकर

 

कणकवली :

जागतिक महिला दीनानिमित्त कळसुली ग्रामपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच श्री. सचिन पारधीये व उपसरपंच श्री. गजानन मठकर यांच्या उपस्थितीत झाला. “खेळ पैठणीचा” ह्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. शुभदा (भारती) देसाई – आकर्षक पैठणी, द्वितीय क्रमांक सौ. शोभा गावकर – सेमी पैठणी यांनी मान मिळवला. तर तृतीय क्रमांक सौ.रजनी वारंग, चौथा क्रमांक सौ.अनुजा दळवी, पाचवा क्रमांक सौ.आंगणे यांना ही बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. अशा पद्धतीत कळसुली ग्रामपंचायत चे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक महिला भगिनींनी सहभाग घेत उत्साहात कार्यक्रम पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =