You are currently viewing शाश्वत विकास काय आहे हेच डॉ.जयंत परुळेकर यांना समजलेले नाही – विजय केनवडेकर

शाश्वत विकास काय आहे हेच डॉ.जयंत परुळेकर यांना समजलेले नाही – विजय केनवडेकर

डॉ.जयंत परुळेकर यांनी शाश्वत विकासाबाबत मा. सुरेश प्रभू यांच्यावर टीका केली आहे. परुळेकर यांना शाश्वत विकास काय आहे हेच समजलेले नाही. कळणे मायनिंग मध्ये आंदोलन उभे करून नंतर मांडवली कशी केली व राजकीय फायदा कसा घेतला हे पूर्ण जनतेला माहित आहे .जनतेला भडकवून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या परुळेकर यांना कधी शाश्वत विकासात समजणारच नाही.

मा. सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा कोच बांधणी प्रकल्प हा रत्नागिरी लोटे या ठिकाणी कार्यान्वित करून घेतला होता व त्याचे काम पूर्णत्वास येऊन कोच तयार करण्याचा कारखाना थोड्याच दिवसात सुरू होणार आहे.हे परुळेकरांना माहीत नाही. रेल्वे कोच प्रकल्पासाठी आवश्यक मोठी जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एमआयडीसीमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे हा प्रकल्प लोटे येथे नेण्यात आला . शाश्वत विकास ही संकल्पना प्रभू साहेबांनी 1995 साली जनतेसमोर मांडली होती .त्यावेळी हेच परुळेकर शाश्वत विकासाबाबत चेष्टा करण्यापलीकडे काही करत नव्हते . मा. सुरेश प्रभू हे पाच वेळा खासदार केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळून देशाला वेगळे नेतृत्व देण्याचे काम प्रभूंनी केले आहे . प्रभूचे काम जग जाहीर असून वेळोवेळी त्याचा गौरव सर्व जगामध्ये केला जात आहे .खरोखरच विकास म्हणजे काय असतो हे पाहण्यासाठीच भारतातील बऱ्याच कंपन्या सिंधुदुर्गनगरी येथे पाहण्यासाठी आल्या होत्या . त्याचबरोबर त्यांनी प्रत्यक्षपणे कुठले उद्योग कशाप्रकारे सुरू झाले आहेत आणि त्यांना आधुनिकतेची कसे बळ देणे आवश्यक आहे यासाठी ह्या कंपन्या प्रभू साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आल्या होत्या .

शाश्वत विकास म्हणजे सर्वसामान्यांचा विकास यासाठी प्रभूंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बचत गटाचे जाळे विणण्याचे काम प्रथम पणे केले.त्याचबरोबर तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यांची आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण झालं पाहिजे म्हणून जन शिक्षण संस्थेमार्फत वेगवेगळे आवश्यक असणारे कोर्स देऊन . युवकांना महिलांना सक्षम करण्याचे काम प्रभूंनी केले . त्याचबरोबर लुपिन फाउंडेशन सारख्या कंपनीला सी एस .आर फंड घेऊन त्यांना समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना क्लस्टर मार्फत मदत करण्याचे काम करण्यात आले . सुतार समाजातील लोकांचा महाराष्ट्रातला पहिला क्लस्टर करण्यात आला. सिंधुदुर्गात अणाव येथे पहिले नर्सिंग कॉलेज प्रभू साहेबांनी आणले ते यशस्वीपणे सुरू असून 100% निकाल त्याचबरोबर कोणतेही डोनेशन न घेता हे कॉलेज चालवले जात आहे.

सावंतवाडी मळगाव स्टेशनला टर्मिनल चा दर्जा देण्यात आला . कोकण रेल्वे विद्युतीकरणासाठी खास तरतूद करण्यात आली . कोकण रेल्वेच्या डबल ट्रेक साठी नियोजन करण्याचे काम सुरेश प्रभूंनी केले .अशाप्रकारे कोकणच्या विकासासाठी भरीव काम करत असताना सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यासाठी कटाक्षाने प्रभू साहेबांनी लक्ष दिले . परुळेकरांना समजण्यापलीकडचेच आहे . कारण परुळेकरांनी जेवढ्या योजना करणार घोषित केल्या यापैकी एकही योजना अस्तित्वात आलेली कधी दिसली नाही . फक्त प्रसिद्धीसाठी प्रभू साहेबांवरती टीका करण्यापलीकडे काही केलेले दिसत नाही .शाश्वत विकास पाहायचे असेल तर मुद्दामून आपण या प्रभू साहेबांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे सर्वसामान्य जनतेसाठी केलेले उपक्रमाची पूर्ण माहिती पुराव्यानिशी आम्ही तुम्हास देण्यास कटिबंध आहोत. प्रभूंवर टीका करण्यापेक्षा शाश्वत विकासासाठी आपण सिंधुदुर्गात कोणता यशस्वी प्रकल्प केला ते पण जाहीर करून शाश्वत विकासाची संकल्पना आम्हाला पण दाखवण्याची कृपा करावी, असे जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे विचारले  आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − one =