You are currently viewing वेंगुर्ल्यातील भूमी परुळेकर गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवी..

वेंगुर्ल्यातील भूमी परुळेकर गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवी..

वेंगुर्ला :

वेंगुर्लेतील तुळस येथील श्री वेताळ विद्यामंदीर जि. प. प्राथमिक शाळेत पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी कु. भुमी सचीन परुळेकर ही गुरुकुल प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात ५ वी आली आहे. तिला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शितल गावडे व सहशिक्षक एकनाथ जानकर यांचे मार्गदर्शन लाभले.

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे संस्थापक प्रा. सचिन परुळेकर यांची ती मुलगी असून त्यांचेही तिला मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वांनी तिचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा