You are currently viewing पालकमंत्र्यांच्या विरोधातील नाईक, पारकर यांचे कारस्थान उघडे पडले

पालकमंत्र्यांच्या विरोधातील नाईक, पारकर यांचे कारस्थान उघडे पडले

कणकवली नगरवाचनालय संचालक मेघा गांगण यांचा टोला

कणकवली

कणकवली नगरवाचनालयात जाऊन आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुळात अगोदर समजले पाहिजे होते की ज्या कारणामुळे ग्रंथालयाचे कर्मचारी राजीनामा देत आहेत हे कारण पालकमंत्र्यांच्या खात्याशी जोडलेले आहे. ग्रंथालय विभाग पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे येतो. व कर्मचार्‍यांना या विभागाकडून पुरेसे मानधन दिले जात नसल्यामुळे हे कर्मचारी राजीनामा देत आहेत. त्यामुळे हे कर्मचारी राजीनामा देता नये तर त्याकरिता पालकमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्याकरिता निर्णय घेतला पाहिजे. पण शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगर वाचनालयात कर्मचाऱ्यांची भेट घेत असताना पालकमंत्री अकार्यक्षम असल्याचा अधिकृत पुरावा दिल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन असा टोला नगरवाचनालयाच्या संचालक नगरसेविका मेघा गांगण यांनी लगावला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ज्या पक्षात जातील तेथे कारस्थाने करून पक्ष संपवणे व नेत्यांच्या विरोधात राजकारण करणे यात पारकर यांचा हातखंडा आहे. व त्याची प्रचिती पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात कारस्थाने करून नाईक व पारकर यांनी दाखवून दिली असा टोला त्यांनी लगावला. नगरवाचनालयाच्या व्यवस्थे करिता आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातून 5 लाख रुपयांचा निधी दिला. नगर वाचनालय करिता 25 लाखांचा खासदार निधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार फंडातून मागणी करण्यात आला आहे.

लवकरच हा निधी देखील मंजूर होईल असे त्यांनी सांगितले. नगर वाचनालयात जाऊन तेथे स्टंटबाजी करून स्वतःच्या पालकमंत्र्यांना अडचणीत आणणार्‍या शिवसेनेचे सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांना जर जनतेचा एवढाच कळवळा असेल तर साहित्य व वाचन या विषयाशी काहीही संबंध नसताना स्टंटबाजी करण्यापेक्षा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची असलेली कमतरता व त्या ठिकाणी रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी अशाच प्रकारे शिवसेनेचे शिष्टमंडळ आपल्या मंत्र्यांना घेराव घालतील काय? असा सवाल मेघा गांगण यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + fifteen =