You are currently viewing जिल्ह्यातील कर्जमागणी व अन्य संबंधीत समस्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी प्रतिसाद कक्ष स्थापन करावा.

जिल्ह्यातील कर्जमागणी व अन्य संबंधीत समस्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी प्रतिसाद कक्ष स्थापन करावा.

संघर्ष समितीचे ॲड. प्रसाद करंदीकर यांची मागणी

देवगड

कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरची लॉकडाऊनची स्थिती यामुळे एकूणच बेरोजगारीचे संकट दाट झाले आहे. त्यातही, सिंधुदुर्ग जिल्हा हा आधीच आर्थिक संकटाशी झुंजत असून आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यातच बँकांच्या अडेलतट्टू धोरणामुळे रोजगारासाठी असलेल्या शासनाच्या अनेक योजना या सिंधुदुर्ग जिल्ह्यात योग्यरित्या राबवल्या जात नाहीत आणि योग्य गरजूंना त्याचा लाभ होत नाही. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात कायमस्वरूपी “प्रतिसाद कक्ष” जिल्ह्यात कार्यान्वित व्हावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीतर्फे ॲड प्रसाद करंदीकर यांनी केली आहे.

जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना त्यांच्या कर्ज प्रकरणासंबंधीच्या तक्रारी योग्य व्यासपीठावर मांडता याव्यात आणि त्यांच्या तक्रारीची वेळीच दखल घेत त्याचा पाठपुरावा करता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी एक “प्रतिसाद कक्ष” स्थापन करण्यात यावा, आणि त्यात जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, आर्थिक महामंडळांचे अधिकारी, रोजगार निर्मिती योजनेच्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांसह सामाजिक हितासाठी बेरोजगार, कर्जदार व जामीनदार यांच्या बाजूने सातत्यपूर्वक विषय मांडणाऱ्या आमच्या संघटनेच्या प्रतिनिधींनाही स्थान देण्यात यावे अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. कर्ज मागणा-या अर्जदारांना वेळीच कर्ज उपलब्ध झाले पाहिजे या दृष्टीकोनातून सर्व शासकीय योजनांच्या कर्जाकरिता संबंधित अर्जदारांना अडचण असल्यास त्यासंबंधीची दाद अर्जदाराला प्रतिसाद कक्षात मागता येण्यासाठी ही व्यवस्था गरजेची आहे, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =