You are currently viewing सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना घेऊन तलावात करणार आंदोलन – प्रसाद गावडे

सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना घेऊन तलावात करणार आंदोलन – प्रसाद गावडे

सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबियांना घेऊन तलावात करणार आंदोलन – प्रसाद गावडे

कुडाळ

सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या भोंगळ कारभारामुळे पाटबंधारे विभागात नियुक्ती करण्यात आलेले तलाव सुरक्षारक्षक तब्बल ५ महिने पगारापासून वंचित आहेत. याबाबत स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या प्रकाराची गंभीर दखल घेवून तात्काळ योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा त्या सर्व सुरक्षारक्षकांच्या कुटुंबाला घेऊन ओरोस येथील पाटबंधारे विभागाच्या तलावात आंदोलन करू, असा इशारा श्री. गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा