You are currently viewing पु. ल. कला महोत्सवाने दिवाळीचा आनंद द्विगुणित

पु. ल. कला महोत्सवाने दिवाळीचा आनंद द्विगुणित

*पु. लंच्या लेखणीतून साकारलेली स्त्रीपात्र रंगमंचावर अवतरली*

*पु. ल. कला महोत्सवाने दिवाळीचा आनंद द्विगुणित*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर २०२३ सायं. ६ वा. अभिजात रंगयात्रा या संस्थेच्या कलाकारांनी ‘संग्रहापलिकडचे पु. ल.’ हा पु. ल. देशपांडे यांच्या प्रकाशित परंतु असंग्रहित साहित्यावर आधारित कार्यक्रम नीलिमा पारकर, अमित संसारे, शितल नार्वेकर, प्रणोती बापार्डेकर, सुबोध हर्डीकर आणि अदिती आनंद यांनी सादर केला. पु. ल. कलाकादमीच्या सल्लागार समितीचे सदस्य, कला आणि साहित्य क्षेत्रातले मोठे नाव ज्येष्ठ चित्रकथाकार विजयराज बोधनकर यांनी रंग, रेषांची भाषा कॅनव्हासवर उमटवत एक वेगळा प्रयोग सादर केला. या कार्यक्रमाचं दिग्दर्शन डॉ. शिरीष ठाकूर यांनीकेलं होतं. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी उपस्थित होते.

पुलंनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा अनेक प्रकारच्या आहेत. काहीतर पोट धरून खूप खूप हसवणाऱ्या आहेत, तर काही थोड्याशा भावनिक आहेत, तर काही व्यक्तिरेखा पुरुषांच्या तर काही स्त्रियांच्या देखील आहेत. अनेक स्त्रियांचा स्वभाव, त्यांचं वागणं बोलणं पुलंनी आपल्या लेखणीतून आणि त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून साकारली. त्यापैकीच काही स्त्रीपात्र अभिवाचन, नाट्यप्रवेश यांसह दृकश्राव्य सादरीकरणातून उत्स्फूर्त, ठाणे यांचे कलाकार अमूल पंडित, माधव चिरमुले, अंजली शेवडे, मिथिला गायतोंडे, स्मिता नायर आणि प्रिया ओक यांनी ‘स्त्री व्यक्तिरेखा…. पु. ल. यांच्या लेखनातल्या’ हा कार्यक्रमातून उलगडल्या.

स्त्री व्यक्तिरेखांची सुरूवात गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यापासून झाली. त्यानंतर वार्‍यावरची वरात मधली गुणवंती बेचलवार ही व्यक्तिरेखा स्मिता नायर यांनी इतकी अप्रतिम साकारली की सभागृहात हशा पसरला. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका ज्योत्स्ना भोळे ह्या पुलंच्या बालमैत्रिणीचं शब्दशिल्प कलाकारांनी देखणं केलं. सुंदर मी होणार मधील दिदीराजे ही विविध भावछटा काही क्षणांत उलडणारी व्यक्तिरेखा स्मिता नायर अगदी ताकदीने साकारली. ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचं शब्दचित्र आपल्या अभिवाचनातून कलाकारांनी उत्तम वठवल. त्यानंतर वार्‍यावरची वरात मधील कडवेकर मामी व्यासपीठावरून थेट प्रेक्षकांच्या बैठकीच्या खोलीत पोहचवल्या प्रिया ओक यांनी. त्यांना मिसेस गुप्ते (स्मिता नायर), मिसेस गर्दै (मिथिला गायतोंडे), मालताई (अंजली शेवडे) आणि अमूल पंडित यांनी सुरेख साथ दिली. इरावती कर्वे यांची व्यक्तिरेखा आपल्या अभिवाचनातून आणि संहितेतून कलाकरांनी व्यासपीठावर उभी केली.
असा मी असा मी मधील व्यक्तिरेखा सौ. अन्नपूर्णा धोंडोपंत जोशी सभागृहात खसखस पिकवून गेली. बटाट्याची चाळ मधील डॉ. काव्यकला कोरके ही व्यक्तिरेखा साकारताना स्मिता नायर आणि मिथिला गायतोंडे विशेष दाद मिळवून गेल्या. संगीतातलं माणिक अर्थात सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा आणि त्यांच्या आवाजाची छटा अभिवाचनातून कलाकरांनी अलवार उलगडली. बाय अर्थात पुलंची आजी पण ती सहजसुलभ सादरीकरणातून सभागृहातल्या प्रत्येकाला त्यांची आजी भेटून गेली. पुलंच्या ‘ती फुलराणी’ मधील मंजुळा प्रिया ओक यांनी अगदी हुबेहुब साकारली आणि कलांगणातल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडातून कलाकरांना पोचपावती मिळाली.

सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका मीनल जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचं नेमक्या आपल्या शब्दांमध्ये सूत्रसंचालन निमिषा किरण वालावलकर यांनी केलं. पु. ल. महोत्सव २०२३ च्या समन्वयाची जबाबदारी राकेश तळगावकर आणि सहकारी शिताफीने पार पाडत आहेत. तर छायाचित्रकार सिद्धेश्वर वांदरकर नेमके क्षण आपल्या कॅमऱ्याने टिपत आहेत.

विक्रम संवत्सर २०८०च्या प्रतिपदेला अर्थात मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७ वाजता पं. शैलेष भागवत आणि विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मधुर स्वरांनी ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव – दीपावली पहाट’ कलांगण येथे रंगणार आहे. तर बालदिनाचे औचित्य साधून विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी सकाळी १० वाजता नवीन लघुनाट्यगृहात, ‘फुलवा मधुर बहार’ हे संगीत बालनाट्य कलांगण, मुंबई ही संस्था सादर करणार आहे. सायं. ५ वाजता नवीन लघुनाट्यगृहात, भारतीय मूर्तीकलेवर आधारित शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून ‘भगवती’ हा स्त्री-शक्तीचा जागर करणारा कार्यक्रम ज्येष्ठ नृत्यांगना सोनिया परचुरे आणि सहकारी सादर करणार आहेत. आणि पु. ल. कला महोत्सवाची सांगता रात्रौ ८ वाजता पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अभ्यंग संगीत साधना महोत्सव अंतर्गत विदुषी कलापिनी कोमकली यांच्या गायनाने कलांगण येथे सर्व पुलप्रेमींनी तसेच कलासक्त रसिकजनांसाठी विनामूल्य सादर होणार आहेत.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा