You are currently viewing १० मे ला पाडलोस श्री देव रवळनाथाचा वर्धापनदिन सोहळा

१० मे ला पाडलोस श्री देव रवळनाथाचा वर्धापनदिन सोहळा

बांदा :

 

पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. १० मे रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वा. शुद्धीकरण, १०.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. रात्रो ९.३० वा. श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळाचा ‘बाळूमामा’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी, नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा