You are currently viewing १२ मे रोजी आरवली श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा

१२ मे रोजी आरवली श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा

वेंगुर्ला.

 

वेंगुर्ला आरवली येथे श्री देव वेतोबा वाढदिवस सोहळा प्रति वर्षाप्रमाणे चालू वर्षीही मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४६ रविवार दिनांक १२ मे २०२४ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. बुधवार दिनांक ८ मे पासून बुधवार दिनांक १५ मे पर्यंत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

यामध्ये बुधवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा, गुरुवार दिनांक ९ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व रात्री ९ वाजता स्वराभिषेक अभिषेक काळे (सांगली) यांची अभंग नाट्यगीत भावगीतांची सदाबहार मैफिल, शुक्रवार दिनांक १० मे रोजी रात्री ८ ते ९ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा व रात्री ९ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा दणदणीत नाट्य प्रयोग, शनिवार दिनांक ११ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक विधी , रात्री ८ ते ९ धार्मिक श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता कलानिलयम ढवळी फोंडा गोवा प्रस्तुत पदन्यास भरतनाट्यम नृत्याविष्कार, रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक कार्यक्रम पूर्णाहुती बलिदान, दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ८ ते ९ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री १०.३० वाजता श्री देव गिरोबा नाट्य मंडळ आरोस प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती वि .वा शिरवाडकर लिखित व प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित तीन अंकी नाटक नटसम्राट, सोमवार दिनांक १३ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्री रामेश्वर बाल दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले यांचा दशावतारी नाट्य प्रयोग, मंगळवार दिनांक १४ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता श्रींची इच्छा नाट्य मंडळ तेंडोली प्रस्तुत वि .वा शिरवाडकर लिखित संगीत तीन अंकी पौराणिक बोधप्रत नाट्यपुष्प संगीत ययाती आणि देवयानी व बुधवार दिनांक १५ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोग संपन्न होणार आहे.

श्री देव वेतोबाच्या वाढदिवसा प्रित्यर्थ होणाऱ्या वरील सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व श्रींचे आशीर्वाद घ्यावेत असे श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी आरवली व गावकर, मानकरी, आरवली ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा