You are currently viewing सामाजिक बांधिलकी सावंतवाडी या संघटनेने शासकीय योजनेतून डोळ्यांचे मोफत ऑपरेशन

सामाजिक बांधिलकी सावंतवाडी या संघटनेने शासकीय योजनेतून डोळ्यांचे मोफत ऑपरेशन

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी सावंतवाडी या संघटनेने शासकीय योजनेतून डोळ्यांचे मोफत ऑपरेशन हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यांना कोणाला मोतियाबिंदूचे ऑपरेशन व डोळ्यांच्या विकाराबाबत काही समस्या असल्यास अशा व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेशंट सोबत त्याचा एक नातेवाईक असणं गरजेचं आहे. त्या अगोदर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डोळे तपासणी मंगळवार व शुक्रवार सकाळी 10 ते 3 पर्यंत ठेवण्यात आलेला आहे. शहरात व आजूबाजूच्या गावांमध्ये मोतीबिंदचे पेशंट असतील तर त्यांनी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, समीर वंजारी व संजय पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा. राजू मसुरकर 9422435760 रवी जाधव 9405264027 संजय पेडणेकर 9422379502 समीर वंजारी 9822454023
गेल्या महिन्यात 224 डोळ्यांची ऑपरेशन विनामूल्य जिल्हा रुग्णालय ओरोस मध्ये करण्यात आलेली होती अशी माहिती नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. शुभजित धुरी यांनी दिली.
आज सावंतवाडी शहरातील दोन वयोवृद्ध व्यक्तींना सामाजिक बांधिलकी कडून पूर्ण सहकार्य करून त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवून दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =