You are currently viewing प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत,सदस्यांचे वाढदिवस आणि भावगीत भक्तीगीत संपन्न
Oplus_16908288

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत,सदस्यांचे वाढदिवस आणि भावगीत भक्तीगीत संपन्न

प्राधिकरण / निगडी (दि.२९ मे) :

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघातर्फे माऊली उद्यानात संध्याकाळी ५ वाजता एप्रिल व मे महिन्यातील सदस्यांचे वाढदिवस व हिंदी मराठी भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. याचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.
यात ८ संघातील, २१ सभासदांनी सहभाग घेतला होता.
मध्यंतरात एप्रिल व मे महिन्यातील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले . याचे सूत्रसंचालन श्री.श्रीनिवास ठोंबरे यांनी केले.

श्री अतुल इनामदार यांच्या माध्यमातून सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत धनादेश स्वरूपात देण्यात आली. प्राधिकरण भागातील आधार केंद्र (संचालिका मेधा अय्यर). मानवता हिताय सोशल फौंडेशन (संचालक, श्री धनराज चौधरी), मातृसेवाभावी संस्था (प्रशासक श्री सूर्यकांत बरसावडे), सुहृद मंडळ मूकबधिर विद्यालय (प्रतिनिधी). झुंज दिव्यांग संस्था (संचालक श्री राजू हिरवे), स्नेह सावली संस्था (डॉक्टर अविनाश वैद्य) यासंस्थेच्या प्रतिनिधीनी आपले मनोगत व्यक्त केले. व असेच स्नेहपूर्वक संबंध रहावेत असे सांगितले.

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सर्व गायक कलाकारांचे कौतुक केले. शिवाय सक्षमपणे कार्य करणाऱ्या, कार्यकारिणी सदस्यांना धन्यवाद दिले. तसेच भावगीत भक्ती गीतांची धुरा (समन्वयक) ज्यांच्या खांद्यावर दिली ते मनोहर जोशी, श्रीनिवास ठोंबरे,आशा नष्टे,वृषाली गुर्जर यांचे अभिनंदन केले. पहिलाच कार्यक्रम अतिशय देखणा असा झाला.

शेवटी, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत पौर्णिमा कासार यांनी सादर केले. संघाची प्रार्थना व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

आपल्या ओजस्वी शैलीत सौ. ज्योती कानेटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हा कार्यक्रम अतिशय देखणा, विलोभनीय, आणि कार्यकारिणीतील सर्व सदस्यांच्या सहकार्याने सफल झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा