*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चोचले पुरवू आता जिभेचे*
पडतात बाहेर पाऊस धारा
वातावरण आहे उबदार छान
चोचले पुरवू *आता जिभेचे*
पावसाला मिळालय वरदान
//1//
पोरही येतील आता शाळेतून
गारठून जातील गरीब बिचारी
मारून ताव खेकडा भज्यांवर
केळी भज्यांच्या देतील ऑर्डरी
//2//
असला जरी वार *सोमवार*
भगवान शंकर करतील क्षमा
घालू नमस्कार साष्टांग त्याना
करणार नाहीत आज *हंगामा*
//3//
बटाट्या बरोबर चालेल मायाळू
होतील भजी जरा *कुरकुरीत*
चटणी लसणाची असूदे सोबत
नकोत वांग्याची *मिळमिळीत*
//4//
खाऊन टेस्टी पकडून एसटी
जाऊया नंतर *माळशेजला*
धबधबे पाण्याचे अखंड वहाती
नसतो फुर्सत क्षण विश्रांतिला
//5//
धावून अव्याहत फेस तोंडी
येतो मुखी प्रत्येक सरीतेला
*आरोप* होतो त्यांचे वरती
आजकाल हा आशिष ठरला
//6//
घेऊन वरती चहा आल्याचा
समजू तीर्थ प्रसादा सोबतचे
करून टाकू समाप्ती आज
ठरवून टाकू कधी जमायचे
//7//
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157