You are currently viewing ‘झिरो वेस्ट सिंधुदुर्ग’ संकल्पना प्रभावीपणे राबवा…. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

‘झिरो वेस्ट सिंधुदुर्ग’ संकल्पना प्रभावीपणे राबवा…. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

‘झिरो वेस्ट सिंधुदुर्ग’ संकल्पना प्रभावीपणे राबवा…. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कचरा मुक्तीसाठी विशेष कक्षाची स्थापना…

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक पार पडली.सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने स्वच्छता ही केवळ शासकीय जबाबदारी न राहता लोकसहभागातून ती एक चळवळ बनली पाहिजे,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ​
या जिल्हास्तरीय विशेष कक्षाच्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय विभागांना ‘प्लास्टिकमुक्त कार्यालय’ संकल्पना राबवण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओला, सुका, सॅनिटरी व विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करून जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.
​पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनाऱ्यांवर एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करणे, कचरापेट्या बसवणे आणि ‘आरआरआर’ केंद्रे उभारण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाला जिल्ह्यातील अधिकृत व अनधिकृत कचरा स्थळांचे ‘जिओ-टॅगिंग’ करण्याचे आदेश देण्यात आले असून, एमटीडीसी मार्फत पर्यटकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खतनिर्मिती करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.

प्रतिक्रिया व्यक्त करा