You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई; अग्निशमन बंबाद्वारे पाणीपुरवठा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई; अग्निशमन बंबाद्वारे पाणीपुरवठा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाणीटंचाई; अग्निशमन बंबाद्वारे पाणीपुरवठा

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे सहकार्य; नादुरुस्त पंप व इलेक्ट्रिक पॅनलची दुरुस्ती पूर्ण

सावंतवाडी :

येथील उपजिल्हा रुग्णालयातील पाण्याचा पंप बुधवारी सायंकाळी अचानक नादुरुस्त झाल्याने रुग्णालयातील रुग्णांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. याबाबत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळताच गुरुवारी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यात आला.
या कामासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी विशेष पुढाकार घेत मोलाचे सहकार्य केले. तसेच रुग्णालयातील नादुरुस्त पंप आणि त्याचे इलेक्ट्रिक पॅनल दुरुस्त करण्यासाठी रुग्णालयाचे अधिकारी आनंदराव गायकवाड व मेट्रन सिस्टर गौरी गोसावी यांनी विद्युत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने दुरुस्ती करून घेतली.
संकटाच्या काळात तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांकडून सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
ही माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा