You are currently viewing आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा केले पालकत्व सिद्ध : दिलेला शब्द केला तत्परतेने पुर्ण

आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा केले पालकत्व सिद्ध : दिलेला शब्द केला तत्परतेने पुर्ण

वैभववाडीतील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पहिल्या टप्प्यात केले 25 बेड उपलब्ध

संकटसमयी मदतीला धावणाऱ्या नितेश राणेंचे रुग्णांच्या नातेवाईकांनी मानले आभार

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी येथील कोवीड केअर सेंटरला 25 बेड उपलब्ध करून दिले आहेत. सत्ताधाऱ्यांप्रमाणे केवळ घोषणाबाजी न करता दिलेला शब्द तत्परतेने पूर्ण करत तालुक्याचे पालकत्व पुन्हा एकदा नितेश राणे यांनी सिद्ध केले आहे. दिलेल्या सेवेबाबत रुग्णांच्या नातेवाइकांकडून आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यात आमदार नितेश राणे कोरोना योद्ध्यासारखे कार्य करत आपले पालकत्व सिद्ध केले होते. जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर व कर्मचारी, खाजगी डॉक्टर, सरपंच यांना त्यांनी पीपीई कीट उपलब्ध करून दिले होते. जिल्हावासीयांना त्यांनी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मोफत वाटप केल्या होत्या. तालुक्यातील गरीब व गरजू तसेच परप्रांतीयांना दोन महिने मोफत कमळथाळी जेवण दिले होते. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले होते.
दुसऱ्या लाटेत वैभववाडी तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत जवळपास 250 रूग्ण सक्रिय आहेत. तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये बेडची क्षमता कमी असल्याने रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या आढावा बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांकडून आमदार नितेश राणे यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान अधिकाऱ्यांनी कोवीड केअर सेंटरला बेडची कमतरता भासत असल्याचे आ. नितेश राणे यांना सांगितले. नितेश राणे यांनी तात्काळ 50 बेड देतो असे जाहीर केले. त्याची पूर्तता तालुक्याचा पालक या नात्याने जबाबदारीने त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 25 बेड रुग्णांसाठी तालुक्यात दाखल झाले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत रुग्ण सेवेसाठी झटणाऱ्या लाडक्या नेत्याचे तालुकावासियांतून आभार मानले जात आहेत. सदर बेड हे नगरपंचायत प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक संताजी रावराणे, सुनील भोगले, मुख्याधिकारी सुरज कांबळे, कर्मचारी श्री. पवार, सचिन माईणकर, मदा इंदप, सुनील निकम व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + seven =