You are currently viewing महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने दिले जाणारे सन्मान 2026 चे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने दिले जाणारे सन्मान 2026 चे पुरस्कार जाहीर

धाराशिव :

महाराष्ट्र लोकविकास मंच या स्वयंसेवी संस्था संघटनेच्या वतीने दरवर्षाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरविण्यात येते. अवार्ड 2026 या कार्यासाठी खालील व्यक्तींची निवड करण्यात आली.

कार्य गौरव पुरस्कार मच्छिंद्र गवाले नांदेड, संघमित्रा गवळे, नांदेड, बालाजी शिंदे, लातूर, ज्ञानेश्वर हनवते संभाजीनगर, सुभाष साबळे लातूर, तानाजी जाधव धाराशिव, सुनील नेमाने संभाजीनगर, महावीर डोके धाराशिव, बायजाबाई घोडे परभणी, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार श्रीकांत भाभे ठाणे, जीवन गौरव पुरस्कार पुष्पाताई नडे पुणे, जीवनगौरव पुरस्कार, अंशू गुप्ता दिल्ली.

महाराष्ट्र आणि भारतातील नामवंतचा गुणगौरव सन्मान कार्यक्रम दहा डिसेंबर 2026 रोजी पर्याय संस्था कळंब जिल्हा धाराशिव येथे, महाराष्ट्र लोक विकास मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर,सचिव भूमिपुत्र वाघ,उपाध्यक्ष एम एम कोंढाळकर खजिनदार मनीषा घुले, प्राचार्य वेंकट अनिगुंटे अजित कांकरिया यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव भूमिपुत्र वाघ यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा