You are currently viewing अस्वलाच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्यांना आर्थिक मदत देणार – इस्माईल जळगावकर

अस्वलाच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्यांना आर्थिक मदत देणार – इस्माईल जळगावकर

परिसरात ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी
चौकुळ बेरडकीवाडी येथे अस्वलाने केलेल्या हल्ल्यात जायबंदी झालेल्या दोघाही शेतकर्‍यांना वनविभागाच्या माध्यमातून योग्य ते आर्थिक सहकार्य देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहीती सावंतवाडी वनविभागाचे प्रभारी उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी आज येथे दिली. दरम्यान हल्ला ज्या परिसरात झाला आहे, त्या ठिकाणी अस्वलाचा संचार आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आंबोली-चौकुळ येथील बेरडकी परिसरात झालेल्या हल्ल्यात दोघे शेतकरी जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा-बांबूळी येथे अधिक उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी आपण प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे श्री.जळगावकर यांनी सांगितले. परिसरात अस्वलांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतात तसेच अन्य कामांसाठी जाणार्‍या ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + twenty =