You are currently viewing मनाचिये गुंती

मनाचिये गुंती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखक कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*मनाचिये गुंती*

 

असं म्हणतात की समुद्राच्या तळाचा आणि स्त्रीच्या मनाचा थांग कुणाला कधीच लागत नाही. पण हे पूर्ण सत्य नाही कारण फक्त स्त्रीच्याच काय तर कुठल्याही माणसाच्या मनाध्ये काय चाललंय हे कुणाला कधीतरी कळू शकेल का? माणसाच्या चेहऱ्यावर जरी विचारांचं प्रतिबिंब विलसत असलं तरी चेहऱ्यावर चेहरा घालून मुखवटे धारण करणाऱ्यांची इथे काय कमी आहे. आणि त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की माणसाला स्वतःच्या मनात काय चालू आहे याचा तरी थांगपत्ता असतो का? एखाद्या अवचित वळणावर काही अनपेक्षित प्रसंग उद्धवला तर आपलं मन मेंदूला काय करायला सांगेल, कुठली आज्ञा देईल याचं पूर्वानुमान लावणे केवळ अशक्य आहे.

प्रत्येक वेळी तोलून मापून सारासार विचार करून आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून बरेच लोक निर्णय घेत असतात, वागत असतात; पण अशी कधीतरी वेळ येते की ही सद्सद्विवेक बुद्धी तिथे काम करत नाही.

कधीतरी आपल्या हातूनच ही गोष्ट घडली आहे हे मानायला आपणच काय इतरही लोक तयार होत नाहीत. तेव्हा हे काय रसायन असावं जे मनाला आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागायला लावत असेल?

 

आपला मेंदू सकारात्मक गोष्टींपेक्षा दुपटीने अधिक नकारात्मक गोष्टींकडे आकृष्ट होतो आणि त्या लक्षातही ठेवतो. आता हेच बघा ना खरं तर प्रत्येक गोष्टीत मानलं तर किती सुख आहे पण सुखाचे दिवस माणूस पटकन विसरतो आणि दुःख झालं की किती किती दिवस उगाळू आणि किती नको असं त्याला होऊन जातं. दुःख विसरायला खूप वेळ जावा लागतो. आणि जर या नकारात्मक विचारात माणूस सतत राहिला तर त्याचा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मकच होत जातो. त्यातून राग, भीती, हताशा, नैराश्य या गोष्टींचा उगम होतो. आणि यात महत्वाचा भाग असा आहे की या नकारात्मक गोष्टीतून पुन्हा पुन्हा नकारात्मक गोष्टीच समोर यायला लागतात. जेणेकरून पुन्हा त्याचं दुःख साजरं करत बसावं लागतं. नकळतपणे माणूस या चक्रात अडकून पडतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आणि व्यक्तीचा हेतू वाईटच असतो इतके पराकोटीचे वाईट विचार येऊ लागतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यावर तर याचा वाईट परिणाम होतोच होतो पण ही नकारात्मकता तुम्ही जिथे जिथे जाल तिथे घेऊन जात असता आणि ती आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडत असते.

तुम्ही हे निश्चितच मार्क केलं असेल की एखाद्या घरात गेल्यावर आपल्याला पटकन तिथून बाहेर पडावं असं वाटतं. तसं तर चार भिंती एक छप्पर असंच तुमच्या आमच्या सारखंच ते घर असतं पण या नकारात्मक विचारांच्या लहरी तुम्हाला आपल्या मध्ये ओढून घ्यायला बघतात. जर तुमच्यात थोडी सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर तुम्ही तिथून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मार्ग शोधता.

आणि अगदी याच्या उलट काही काही घरं, काही काही जागा इतक्या प्रसन्न असतात की तुम्ही तिथे आपसूकच ओढले जातात आणि पुन्हा पुन्हा बोलावल्यासारखं लोहचुंबकाप्रमाणे तिथे आकर्षित होता. जसं की आपली प्रार्थना स्थळं! तिथल्या घंटा नादामुळे, रोजच्या पूजेच्या वेळेच्या मंत्रोच्चारांमुळे, सुंदर ताजी फुले,धूप दीप…या सगळ्यांमुळे तिथे एक दैवी अस्तित्व तर निर्माण झालेलं असतच शिवाय वातावरणात अतिशय सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सतत जागृत असतो. अशा ठिकाणी गेल्यावर तुमच्याही चित्रवृत्ति प्रफुल्लित होतात आणि चांगले विचार मनात यायला लागतात. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

 

पण समजा तुमचा नाही विश्वास या मूर्तीपूजेवर. मंदिरामध्ये जाऊन बसावं असं नाही तुम्हाला वाटत. मग काय करू शकतो आपण? याचे उत्तर काही फार अवघड नाही. मनसोक्त निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करा. निसर्ग म्हणजे एक खूप मोठा स्त्रोत आहे आनंदाचा, ऊर्जेचा, ज्याच्यापासून तुम्ही अस्पृश्य राहूच शकत नाही. तुम्ही कुठल्याही पदावर असा पण मनाला सतत सकारात्मक ऊर्जा देणारी काहीतरी आणि कुठली तरी सवय लावून घेणे खूप आवश्यक असतं. भले तुम्ही घरात असा वर्किंग असाल बिजनेस करत असाल तुमचं लिंग, वय काहीही असो सतत कुठल्या ना कुठल्या तरी ऊर्जादायी कार्यात स्वतःला अडकवून ठेवणं ही एवढी एक साधीशीच गोष्ट आहे नकारात्मक ऊर्जेला आपल्यापासून दूर ठेवण्याची.

 

शास्त्रज्ञांचे म्हणणं असं आहे की एका नकारात्मक अनुभवाला मात द्यायची असेल तर तीन सकारात्मक अनुभवांना आपलेसे करावे लागते किंवा सामोरे जावे लागते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एक नकारात्मक विचार किती प्रभावशाली असतो. आणि यावरूनच आपण असेही म्हणू शकतो की एका ठराविक वेळेनंतर या सकारात्मक सवयी सुद्धा बदलत राहिलो तर त्याचा कंटाळा येणार नाही आणि त्यातून बाहेर येणारे आउटपुट आपण जास्त एन्जॉय करू शकू. शक्यतो सकाळच्या आणि नाही जमलं तर संध्याकाळच्या मोकळ्या ताज्या हवेत फिरायला जाणं कधीही उत्तम. जमत असेलच तर थोडं जॉगिंग ही करता येईल. समवयस्कांबरोबर हास्य क्लब ला उपस्थित राहणं ही खूप छान उपाय आहे. प्रकृती साथ देत असेल तर जवळपासच्या दरीखोऱ्यात एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबर ट्रेकिंगला जाणं किंवा छोट्या-मोठ्या ट्रीप करणे खूप फायदेशीर ठरतं. अगदीच कुठे जायला जमत नाही अशी परिस्थिती असल्यास आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. त्यामुळे शरीरातली ऑक्सिजनची पातळी वाढेल आणि अर्थातच बऱ्याच व्याधींना दूर ठेवता येईल.

याबाबतीत आत्मप्रौढी म्हणून नाही पण माझ्या वडिलांचं उदाहरण द्यायला मला आवडेल. आता जवळपास वयाची ऐंशी वर्षे पूर्ण होताताहेत त्यांना पण अजूनही दिवसभर ते कुठल्या ना कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवत असतात. भारतभर फिरून झालेलं आहे.अगदी टेक्नोसॅव्ही म्हणता येईल इतकं त्यांचं कम्प्यूटरचं ज्ञान अपडेटेड असतं. लॅपटॉप वर शेयर ट्रेडिंग करणं हा तर त्यांचा फार आवडीचा छंद आहे.तासनतास रमतात ते यामधे. आणखी वर मलाही मार्गदर्शन असतच. ऑनलाईन कुठलीही वस्तू सर्व्हे करून मागवतात, कुणावर अवलंबून रहात नाहीत; हे खूप प्रशंसनीय आहे असं मला वाटतं.

 

तर सांगायचा मुद्दा हा की मानसिक आणि शारीरिक गुंतवणूक जर आनंददायी, योग्य जागी केली तर येणारा दिवस ओझं वाटणार नाही. मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा परिपूर्ण उपयोग करून आपण निश्चितच आनंदी जीवन जगू शकतो.

 

अंजली दीक्षित -पंडित

छ. संभाजीनगर

९८३४६७९५९६

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा