You are currently viewing रेडी वायरमन तनय सावंत यांचे उपचारादरम्यान निधन

रेडी वायरमन तनय सावंत यांचे उपचारादरम्यान निधन

दोन दिवसांपूर्वी शॉक लागून झाला होता अपघात :गोवा येथे सुरू होते उपचार

वेंगुर्ले:

तालुक्यातील रेडी येथील वायरमन तन्मय जगन्नाथ सावंत (वय ३०) हे रेडी येथे सेवा बजावत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांचा विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. दरम्यान उपचार घेत असताना आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनांने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

रेडी तेरेखोल ११ केव्ही लाईनचे काम सुरू असताना शॉक लागल्याने वायरमन सावंत हे दोन दिवसांपूर्वी जखमी झाले. त्यांना त्वरित वायरमन राहुल कनयाळकर ,अजित पडवळ, रेडी सरपंच रामसिंग राणे व ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा धारगळ येथे हलविण्यात आले होते. गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + eleven =