You are currently viewing डोजर तलावा बाहेर ठेवून गाळ काढण्याची पध्दत चुकीची – अनिल केसरकर

डोजर तलावा बाहेर ठेवून गाळ काढण्याची पध्दत चुकीची – अनिल केसरकर

अपघात टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने लक्ष द्यावा…

सावंतवाडी

डोजर तलावाबाहेर उभा करून मोती तलावातील गाळ काढण्यात येत असल्याने फुटपाथ खचला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुकीची पध्दत न वापरता तलावात मशिनरी उतरून गाळ काढावा, अशी मागणी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी मोती तलावातील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले असून हा गाळ काढण्यासाठी ज्या पद्धतीचा सध्या अवलंब करण्यात येत आहे, ती पद्धत पूर्णपणे चुकीची व नागरीकांना त्रासदायक आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी सध्या केवळ एका डोजरचा वापर करण्यात येत असून हा डोजर फुटपाथ वर उभा करून तळ्यातील गाळ काढला जात आहे. डोजर फूटपाथ वर उभा करून काम चालू असल्यामुळे अलिकडेच लाखो रुपये खर्च करून बसवलेल्या फुटपाथ वरील फरशा फुटल्या असून लोकांना चालताना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे एखादा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. डोजर तलावाच्या बाहेर उभा करून काम चालू असल्यामुळे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. आतील गाळाचे प्रमाण बघता डोजर आत उतरवून व मशिनरी वाढवून जलद काम करणे गरजेचे आहे. यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, व काम लवकरात लवकर पुर्ण करावे, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =