साहित्यलेणी प्रतिष्ठानतर्फे साहित्य संमेलन
पणजी :
अन्न, पाणी आणि हवा जीवन जगण्यासाठी जशी आवश्यक असते तसेच चांगले साहित्य हेही आयुष्यात चांगले विचारांची गरज असते. साहित्य आणि संगीत हे त्यासाठी पूरक असतात. चांगल्या पुस्तकांव्दारे ती गरज पूर्ण होत असली तरी त्यासाठी भाषा हे महत्त्वाचे साधन असते. दुःख, त्रास आणि वेदना विसरायला साहित्य मदत करते तरीही भाषा टिकून राहण्यासाठी आपण सतत आणि पिढ्यान् पिढ्या ती बोलत राहिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायिका आणि संमेलनाध्यक्ष पद्मश्री पद्मजा फेणाणी यांनी केले.
साहित्यलेणी प्रतिष्ठान, ताळगाव या संस्थेतर्फे दो मे २०२६ रोजी पणजीत एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वागताध्यक्षपदी गोव्याचे प्रसिध्द उद्योगपती श्रीनिवास धेंपो होते. परंतु कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या ऐवजी यतीश धेंपो उपस्थित होते, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर यांनी दिली. उद्घाटक म्हणून बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्ली या संस्थेचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांनी केले. समेलनासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर उपस्थित होत्या. त्यांनी लाईव्ह पेंटिग्जही काढले. त्याशिवाय समेलनास दशरथ परब, डॉ. बसवेश्वर चेणगे, साहित्यलेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर आणि साहित्यिक पत्रकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी निधी संके नृत्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली.
या संमेलनात सावंतवाडी महाराष्ट्रच्या साहित्यिक उषा परब, गोव्यातील साहित्यिक लक्ष्मी जोग, गजानन देसाई आणि डॉ. संगीता गोडबोले, मदन बोबडे यांचा सन्मान करण्यात आला. संमेलनाचे उद्घाटन मिलिंद महाजन यांनी केले संमेलनात त्यांच्यासह गोव्यातील मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या काही कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात पत्रकार मनस्विनी प्रभुणे, ताळगावच्या सरपंच मारिया फर्नांडिस, ख्यातकीर्त चित्रकार संजय हरमलकर, उद्योजक दीपश्री केरकर, साहित्यिक मदन बोबडे और कलाकार निधी संके आदींचा समावेश आहे.
या संमेलनात रेखा मिरजकर, मेघना कुरुंदवाडकर, पंढरपूरची रूपाली तपकिरे, प्रकाश क्षीरसागर और चित्रा क्षीरसागर यांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
सूत्रसंचालन सिध्दी उपाध्ये यांनी केले.
दुपारी १२ वाजता कथा, कादंबरी और कवितांमधीस स्त्री प्रतिमा हा झाला. त्याच्या अध्यक्षपदी अध्यक्ष प्रा. कृष्णाजी कुलकर्णी होते. या परिसंवादात गजानन देसाई, गीता येर्लेकर, दयाराम पाडलोस्कर आणि आश्विन खरे सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन रजनी रायकर यांनी केले. त्याच्यानंतर पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची मुलाखत कालिका बापट घेतील. पद्मजाताईंची सांगीतिक कारकीर्द आणि अनुभवांचे दर्शन त्यांनी घडविले. सूत्रसंचालन दीप मिरिंगकर करतील. चित्रकार अनुराधा ठाकूर यांची मुलाखत संगीता अभ्यंकर घेतील.
त्यानंतर कवितांची जुगलबंदी कविसमेलन होईल. संगीता गोडबोले आणि माधव सटवाणी त्याच्या अध्यक्षस्थानी होते. कविसंमेलनात गोव्यातील नव्या पिढीचे आणि नामवंत कवी मिळून ४० कवी त्यात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन शर्मिला प्रभू यांनी केले.
