You are currently viewing प्रा.सुभाष गोवेकर यांची अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या सीनियर सिटीजन सेलचे जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रा.सुभाष गोवेकर यांची अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या सीनियर सिटीजन सेलचे जिल्हाध्यक्षपदी निवड

सिंधुदुर्ग :

 

जगप्रसिद्ध अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची मासिक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ विश्वजीत आपगे प.महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप आपगे व सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल लेले यांच्या अनुमोदनानुसार प्रा. सुभाष गोवेकर यांची सीनियर सिटीजन राइट्स प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी विश्वविख्यात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे जागतिक अध्यक्ष डॉ. संतोष बजाज यांच्या हस्ते नियुक्तीपत्र ओळखपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्राध्यापक सुभाष गोवेकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी मध्ये शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचबरोबर विविध सामाजिक, साहित्यिक उपक्रमात ते अग्रेसर असतात. अखिल भारतीय ग्राहक मंचचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या निस्वार्थ सामाजिक योगदानासाठी त्यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते यापुढे तत्पर राहणार आहेत. त्याचबरोबर दोडामार्ग येथील सौ श्रेजल सागर नाईक यांचीही दोडामार्ग तालुका तालुका राइट्स प्रोटेक्शनच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच कुडाळ येथील सौ श्रद्धा नाईक यांची वुमन्स राइट्स प्रोटेक्शनच्या कुडाळ तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. मानवाधिकार व सामाजिक न्याय आयोगाच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू, पिडीत घटकांना मदत करण्याबरोबरच त्यांना मानवी मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहेत महिला अत्याचार, पुरुष अत्याचार, बाल कुपोषण, लैंगिक शोषण, बलात्कार, हुंडा प्रथा, विधवा प्रथा, अवैधस्करी, अवयव तस्करी, खोटे गुन्हे नोंदवणे अशा सर्व गोष्टी विरोधात आवश्यक ती मदत आयोगाच्या माध्यमातून करण्यास प्रा गोवेकर ,सौ श्रेजल नाईक ,सौ श्रद्धा नाईक कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे डॉ. विश्वजीत आपगे, प. महाराष्ट्र अध्यक्ष श्री अमरदीप आपगे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल लेले यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा