You are currently viewing प्रकाश झोतात न आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र

प्रकाश झोतात न आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र

वास्तविक सर्वांना युपीएससी-एमपीएससी किंवा मोजक्याच परीक्षा माहीत असतात. या वर्षीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिविल सर्विसेस परीक्षेत भूमिपुत्रांची निवड झाली. एमपीएससी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून यशोगाथा वाचावयास मिळत नाहीत. अशातच शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी एक अवलिया तिमिरातुनी तेजाकडे या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मोफत मार्गदर्शन देऊन येत्या भविष्यात अधिकारी तसेच कर्मचारी स्वरूपात निवड होण्यासाठी प्रयत्नशील आहे.

1987 यावर्षी जन्म झालेले, रेडकर या नावाचा दबदबा कायम ठेवत, मार्गदर्शन न प्राप्त झाल्यामुळे आईएएस अधिकारी जरी होता आले नाही तरीही कधीही प्रकाशझोतात न आलेला हा अवलिया म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील, कवठणी या गावातील, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर. कर्मचारी चयन आयोगाच्या (STAFF SELECTION COMMISSION) 2017 च्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 166 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मुंबई सीमाशुल्क या विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी, गट-ब या पदावर कार्यरत आहेत. त्याच सोबत त्यांनी B.COM, M.COM, M.A (HINDI), PG DIPLOMA IN HRM, PG DIPLOMA IN LABOUR LAW & INDUSTRIAL RELATIONS, PG DIPLOMA IN TRANSLATION, तसेच यावर्षी LLB ही व्यावसायिक पदवी अशा एकूण सात पदव्या उत्तीर्ण केल्या आहेत.

स्वयम् अध्ययनाने स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी यांनी तिमिरातुनी तेजाकडे उपक्रमाच्या माध्यमातून एक चळवळ उभी केली आहे. यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी तसेच पालक वर्ग या आगळ्यावेगळ्या चळवळीमुळे अत्यंत प्रसन्न आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासकीय कर्मचारी तसेच अधिकारी बनण्यासाठी प्रयत्नशील व्हावे तसेच तिमिरातुनी तेजाकडे उपक्रमाच्या माध्यमातून निशुल्क स्वरूपात मार्गदर्शनाचा व इतर सेवांचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =