You are currently viewing खास.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा

खास.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा

कणकवली भाजपची पोलीस ठाण्यात धडक ;आंदोलन छेडण्याचा इशारा

कणकवली

भाजपा राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल तसेच अशोभनीय वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. खास.राऊत यांचा बंदोबस्त करण्यात यावा व तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल. अशी आक्रमक भूमिका मांडत कणकवली तालुका भाजपच्यावतीने पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले.

कणकवली तालुका भाजपच्या वतीने भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष संतोष कानडे तालुकाध्यक्ष भाजपा कणकवली ग्रामीण, तालुकाध्यक्ष भाजपा कणकवली मिलिंद मेस्त्री, माजी. जि. प. अध्यक्षा संजना सावंत , नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक आण्णा कोदे, प्रज्ञा ढवण, नगरसेवक शिशिर परुळेकर, आशिये सरपंच महेश गुरव, विजय चिंदरकर, श्री. दळवी, यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना निवेदन देण्यात आले. संजय राऊत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असे सांगत संतोष कानडे यांनी आक्रमक भूमिका घ्यायला लावू नका असेही सांगितले.
खास.संजय राऊत यांचा भारतीय जनता पार्टी कणकवली तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. मंत्री राणे यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राऊत यांचा बंदोबस्त करण्यात यावा व तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल. अशी आक्रमक भूमिका माडण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =