You are currently viewing रविवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा…

रविवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा…

सिंधुदुर्गनगरी  : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी जिल्ह्यातील तीन केंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायं. 5 या वेळेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली, एस.एम. हायस्कूल, कणकवली येथे ही परीक्षा होणार आहे.

       सदर परीक्षेसाठी येताना विद्यार्थ्यांनी पुढील साहित्य घेऊन यावे. काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन,  पेन्सिल व आयोगाने परवानगी दिलेले साहित्या, प्रवेश पत्र आणणे सक्तीचे आहे, ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी किमान एक मूळ ओळखपत्र तसेच त्याची छायांकीत प्रत सोबत आणावी.

       तसेच पुढील साहित्य परीक्षा केद्रावर सोबत आणण्यास मनाई आहे. स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्गभूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधन म्हणून वापरण्यायोग्य कोणताही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, परवानगी नसलेली पुस्तके, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इ. प्रकारची साधने, साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व बाळगण्यास सक्त मनाई आहे.

       विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्.या किमान एक तास आधी उपस्थित रहावे. सदर परीक्षा सुरळीतपणे व शांततेत पार पाडण्यासाठई विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, एस.एम. हायस्कूल, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली या केंद्राजवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी. फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक सकाळी 8.00 ते सायं. 5.00 या वेळेत बंद ठेवण्याबाबत तसेच परीक्षेच्या उप केंद्रावर व आवारात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश न देण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी कणकवली यांचे मार्फत मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या कळवितात

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + six =