You are currently viewing साद मनाची…
Oplus_16908288

साद मनाची…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

     *साद मनाची…*

 

साद मनाची साद मनाची नेहमीच हो येते

जर ऐकले आपल्यामनाचे योग्य स्थळी ते नेते

ऐकावे जनाचे करावे मनाचे सांगतात सुज्ञ

परी ऐकती लोक जनांचे मूर्ख आणि ते अज्ञ..

 

स्वयंनिर्णया प्राधान्याने अंमलात आणावे

अगदी अडेल फारच जेव्हा ज्ञानी जना जाणावे

साद मनाची कल्याणाची निर्णय आपला असतो

ऐकतो जो सदा दुज्याचे एक दिवस तो फसतो..

 

मेंदू आहे दिला आपणा दिली देवाने बुद्धी

कशास चालू द्यावी पहा हो इतरांची ती सद्दी

पडछायेसम सतत दुज्याच्या, छत्र नको परक्याचे

निर्णय आपले मन आपले निर्णयही आत्म्याचे..

 

विश्वास असावा आपल्यावरती साद मनाची घ्यावी

नीतिनियमांचे करीत पालन नौका ही वल्हवावी

निर्णय आपला पक्का असता भीती कशाची नसते

जबाबदारी आणि यशाचे पारडे जड ते असते..

 

चला तर मग ऐकू या ना नित्य मनाची साद

गूढ गर्भातून घुमेल हो प्रतिघ्वनी निनाद

साद घालता प्रतिसाद तो मिळतो प्रेमळ मंजुळ

छान

आणि मनाचे होऊन जाते सुंदर हिरवे रान..

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा