You are currently viewing गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषद एक पाऊल पुढे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपरिषद एक पाऊल पुढे

शहर स्वच्छता आणि तक्रार निवारणासाठी   व्हाट्सअप्प आणि टोल फ्री नंबर केले जारी

कोकणातील गणेशोत्सव हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण. कोकणातील चाकरमानी कुठेही कामाधंद्यासाठी असले तरी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येतातच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त चाकरमानी दाखल होतात, त्यामुळे अनेकदा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मालवण नगरपरिषद मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाली असून शहर स्वच्छता आणि तक्रार निवारणासाठी शहरवासीयांकरिता व्हाट्सअप्प आणि टोल फ्री नंबर जारी करण्यात आलेले आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीचे संकट ओढवले होते त्यामुळे शहरात भविष्यात शहरवासीयांना आरोग्याच्या कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी शहर स्वच्छता हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडण्याचे काम सुरू असून डास निर्मूलनासाठी औषध फवारणीची कामे हाती घेतली आहेत. शहरातील कचरा, पाणी, स्ट्रीट लाईट आदी संबंधीच्या तक्रारी आता केवळ एका क्लिक वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले असून तक्रार नोंदवताना तक्रारदाराचे नाव, तक्रारीचा तपशील, पत्ता, व तक्रारी संबंधित फोटो शेअर करण्याचे सूचित केले आहे. मालवण नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे.
मालवण शहरातील शहर स्वच्छता आणि तक्रार निवारणासाठी व्हाट्सअप्प हेल्पलाईन नंबर (९४०५५७७४३१) व टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४३८१ हे ग्राहक सेवेसाठी जारी करण्यात आले आहेत. वरील नंबर वर संदेश आणि फोन करून नागरिक तक्रार करू शकतात अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा