*सिंधुदुर्ग विद्या निकेतनच्या वरद जगतापचे रायफल शूटिंग मध्ये सुयश*
वेंगुर्ले
महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन वरळी, मुंबई या ठिकाणी पार पडली. यामध्ये पीप साइट एअर रायफल सब युथ मेन (NR) या प्रकारामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी वरद विश्वनाथ जगताप हा प्री नॅशनल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
वरद जगतापने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव आनंद परुळेकर, संचालक प्रशांत नेरुरकर. शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
