You are currently viewing धीरज परब मित्र मंडळाच्या युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

धीरज परब मित्र मंडळाच्या युवा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ

येथील धीरज परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजित युवा महोत्सवात तब्बल १५ महाविद्यालयांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यात सिंधुदुर्गातून १३, तर रत्नागिरीतून २ महाविद्यालयातील विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, उद्योजक बापू नाईक, पंजाब नॅशनल बँकचे मॅनेजर निमिश म्हाडेश्वर, हेमंत जाधव, सौ डॉ.नालंदा काजरेकर, सुशांत परब, सचिन गुंड, गौरव मोडक, प्रथमेश धुरी,योगेश राऊळ अभिजीत गोवेकर,चेतन राऊळ,बाबाजी भोई वेदांत कुडतरकर,जगन्नाथ गावडे,सुबोध परब आदी उपस्थित होते.

या महोत्सवाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील एकूण १३, तर रत्नागिरी जिल्ह्यातून दोन कॉलेज सहभागी झाले होते. या महोत्सवा अंतर्गत दिवसभरात ७० स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
१)गायन स्पर्धा- प्रथम संकेत पाटकर (नर्सिंग कॉलेज अणाव)
द्वितीय-स्वरांगी करंदीकर (हॉर्टिकल्चर कॉलेज मुळदे)
तृतीय क्रमांक- गौरेश घावनाळकर (पॉलिटेक्निक मालवण)
२)नृत्य स्पर्धा प्रथम-समर्थ गवंडी (शिरोडा बीएमएस कॉलेज शिरोडा)
द्वितीय-श्वेतांबरी सावंत (पंचम खेमराज सावंतवाडी)
तृतीय-ऋत्विक निकम (आपासाहेब मराठे कॉलेज राजापूर)
३)सांघिक नृत्य
प्रथम-पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ पणदूर
द्वितीय- व्हिक्टर डॉन्टास लॉ कॉलेज कुडाळ
तृतीय-हॉल्टिकल्चर कॉलेज मुळदे.
४)स्कीट स्पर्धा
प्रथम क्रमांक-प्लास्टिक (पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी) द्वितीय-असाही बॅरिस्टर (व्हिक्टर डॉन्टास लॉ कॉलेज कुडाळ)
तृतीय- भाऊ(पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ पणदूर)
तसेच मानाचा -कॉलेज ऑफ द इयर -(पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ पणदूर)यांना देण्यात आले.विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले
या कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून सौ.नेहा कशाळीकर ओरोस,
उमेश माने कुडाळ,
डॉ. प्रणव प्रभू यांनी काम पाहिले.
कार्यक्रमादरम्यान विकास कुराळकर आफरीन करोल(नगराध्यक्ष),अभय शिरसाठ,श्रीराम शिरसाठ अजय आकेरकर (पिंगुळी सरपंच)भूपतसेन सावंत, मिलिंद परब,शैलेश घोगळे ,अनुपसेन सावंत, अर्जुन परब,प्रदीप माने रणजीत रणसिंग,भगवान रणसिंग.आदी मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
सायंकाळच्या सत्रात बक्षीस वितरण समारंभ वेळी बॅरिस्टर नाथ पै संस्थेचे उमेश गाळवणकर प्राचार्य अरुण मर्गज,डॉ. दिपाली काजरेकर चंद्रकांत काजरेकर, निमिष महाडेश्वर,प्रदीप माने,हेमंत जाधव मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मंडळाचे सदस्य जगन्नाथ गावडे, सचिन गुंड,सुशांत परब, प्रथमेश धुरी, गौरव मोडक, सुबोध परब, विनीत परब,विवेक परब सिद्धेश परब,दीपेश परब ऋतिकेश परब,रोहन परब राम बांदेलकर,अभय पाटील,समीर नाईक, वेदांत कुडतरकर,संदीप गावडे,प्रथमेश गावडे, विजय चव्हाण,चेतन राऊळ,शितल पावसकर, हर्षद पालव यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =