You are currently viewing विवाहिता आत्महत्या प्रकरणी तिच्या पतीसह कुटुंबीयांना तत्काळ अटक करा

विवाहिता आत्महत्या प्रकरणी तिच्या पतीसह कुटुंबीयांना तत्काळ अटक करा

मृत विवाहितेच्या वडिलांची सावंतवाडी पोलिसांकडे मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी सबनिसवाडा येथील विवाहीतेने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार रात्री उशीरा उघड झाला. त्यानंतर तिचे वडील प्रभाकर माळकर यांनी या आत्महत्याप्रकरणी तिचा पती व कुटुंबीय जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे. तसेच या प्रकरणावरून संतप्त कारिवडे ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे. संबंधितांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनीही केली आहे.

सावंतवाडी सबनिसवाडा परिसरात एका इमारतीत विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. निधी नीलेश पास्ते (वय २९) असे तिचे नाव आहे. ते दोघेही पती-पत्नी राहत होते. सायंकाळच्या सुमारास पती आज आठवडा बाजार असल्यामुळे बाजार आणण्यासाठी गेले होते. यावेळी घरात कुणी नसल्याची संधी साधून पत्नीने गळफास लावून घेतला. पती घरी आल्यानंतर त्यांना आतून घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने उघडण्याचा प्रयत्न केला तसेच पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरात प्रवेश केला. या वेळी पत्नी गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

मयत निधी निलेश पास्ते ही कलबिस्त पास्तेवाडी येथील असून तिचे पूर्वाश्रमीचे नाव प्रिया प्रभाकर माळकर (रा. कारिवडे ) असे आहे. तिचा २०१८ मध्ये विवाह झालेला होता. त्यानंतर सध्या ती सबनीस वाडा सावंतवाडी येथे राहत होती. तिचा पती, सासु, सासरे यांच्या जाचाला कटाळुन तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =