You are currently viewing बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ ची विद्यार्थिनी सबा शेख पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत दाखल

बॅ.नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ ची विद्यार्थिनी सबा शेख पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत दाखल

कुडाळ :

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज द्वारा आयोजित आंतरविद्यापिठ क्रीडा स्पर्धेसाठी कु. सबा शेख ची उपांत्य फेरीसाठी निवड झाली आहे. सबा शेख ही बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग ची बेसिक बीएससी अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. दरवर्षी क्रीडा महोत्सव व ए आय यु (असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी) स्पर्धांच्या अनुषंगाने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयांमधून विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यापीठाचा संघ निवडला जातो. या निवडीच्या अनुषंगाने विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये निवड चाचणीचे आयोजन करण्यात येत असते. सद्य परिस्थितीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा तसेच खेलो इंडिया या स्पर्धांच्या वेळापत्रकानुसार उपलब्ध अल्प कालावधी विचारात घेतला गेला. त्यातही covid-19 संसर्गजन्य आजारांची सद्य स्थिती विचारात घेता विद्यापीठ संघ निवडीकरिता निवड चाचणी न घेता राज्य तथा राष्ट्रीय स्तरावर विशिष्ट प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना थेट स्पर्धेत सहभाग देण्यात येणार होता. सदर निवड निकषानुसार कुमारी सबा शेख हिची बॅडमिंटन खेळातील यापूर्वीची प्रमाणपत्रे आणि कौशल्य विचारात घेता बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग मधून तिच्या नावाची शिफारस करण्यात आली. आजवरच्या तिच्या राज्यस्तरापर्यंत च्या बॅडमिंटन खेळातील कामगिरीवरून तिची निवड होऊन ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॅडमिंटन च्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या स्पर्धेसाठी ती भोपाळ येथील राजीव गांधी प्रोद्योगिकी युनिव्हर्सिटी येथे दाखल होऊन तीची निवड उपांत्य फेरीसाठी झाली आहे. दिनांक ७ जानेवारी रोजी उपांत्य फेरी संपन्न होत आहे. भोपाळ येथे निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंगळुरू येथील पुढील खेलो इंडिया स्पर्धेकरता सबा सज्ज होईल जिथे ती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करेल. रुग्णसेवे सोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी ची बॅडमिंटनच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेली निवड ही कौतुकाची बाब आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग च्या प्राचार्य सौ मीना जोशी, उपप्राचार्य सौ कल्पना भंडारी, प्रथम वर्ष बेसिक बीएससी नर्सिंग चे वर्ग समन्वयक श्री प्रथमेश हरमलकर आणि इतर शिक्षक वर्गाकडून सबाच्या या यशासाठी अभिनंदन होत आहे. सबाची क्रीडा क्षेत्राविषयी ची आवड, निष्ठा आणि मेहनत यामुळे तिला येथवरचे यश प्राप्त झाले आहे. .. . बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग मधून मिळणाऱ्या अभ्यासक्रमातील शिक्षणाबरोबरच सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या प्रोत्साहनामुळे आज नर्सिंग ची विद्यार्थिनी क्रीडा क्षेत्रात यश संपादन करत आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. सबाची ही कामगिरी महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायक आहे. तिच्या पुढील निवड चाचण्यांसाठी कॉलेज व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =