You are currently viewing व्यथा

व्यथा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*व्यथा*

गवताच्या खोपटात काळी टाकून वाकळ
उदास तो शेतकरी बसं धरूनी कपाळ

लई उन्हाचा कडाका झाडं येली गपगार
आणि फाटल्या अंगानं खिन्न बसलं शिवार

धरित्रीच्या कुशीबंदी नाही थोडा भी ओलावा
मुला माणसाला घास तिने आता कसा द्यावा

काळी माय तापलेली वाट पाहे मिरगाची
सोडी गरम उसासे व्हते काहीली जिवाची

राग मनात धरला आकाशातल्या बापानं
उभ्या वरसाच जनू करपतंय सपान

ये ना आता काळ्या मेघा तुला आन मी घालतो
नको घोर लावू बाप्पा देवा भीक मी मागतो

असा बरस तू देवा देई किरपेच देनं
दुनियेच्या पदरात टाक सुखाचं रे दान

रणरणतं हे उन्ह आन मनात अंधार
कर पिरमाची बरसात दे रे पावसाची सर

जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =