You are currently viewing मृद्गंध

मृद्गंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*” मृद्गंध “*

सागर घनदाट मेघांचा
उचंबळतो अंबरी
अतीव इच्छा त्यातुनी याव्या
सरी वरती सरी ||

काळ्या करड्या फिकट पारव्या
मेघांच्या या लाटा
झाडांमधुनी जणू शोधतो
वारा चोर वाटा ||

भिरभिर वारा पानांमधुनी
छेडीतसे धून
क्षणात येते मळभ वेढुनी
गायब होते ऊन ||

ऊन काहिली सोसेना
तगमग हो जीवाची
तहानलेली सृष्टी पाहे
वाटुली पावसाची ||

वृक्ष डोलती सळसळ पाने
वारा धावत आला
सोबत घेऊनी मृद्गंधा
सांगावा देता झाला ||

अंगे भिजली मने मोहरली
थेंब आले आले
जलधारांनी सचैल सारे
चिंब चिंब मन झाले ||

मृद्गंधाने धुंदी येई
जलधारांनी तृप्ती
विश्व व्यापुनी अभंग राहे
नभ मातीची संतृप्ती ||

( संतृप्ती म्हणजे संपूर्ण समाधान )

*ज्योत्स्ना तानवडे.पुणे*

_________________________
*संवाद मीडिया*

*रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे*

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी* मध्ये *नर्सिंग* क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी

*रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.*(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष *2026-2027*

🔸 *कोर्सचे नांव-

💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*

•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*

•Eligibility- 12th Pass Any Stream

• Duration : 3 Years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*

*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*संधी* –

🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*

*पत्ता:*
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612

*📞 संपर्क:*

*9960906947 / 9422620047*

कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/204123/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा