You are currently viewing खिडकीत बसणारा मुलगा

खिडकीत बसणारा मुलगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*खिडकीत बसणारा मुलगा*

———————————————

 

सोसाट्याचा वारा

मधेच पडलं ऊन

खिडकीतला मुलगा

गेला त्यात हरवून

 

स्वप्नाळू डोळे त्याचे

लगेच गडद होतात

इंद्रधनुचे रंग सारे

चेहेऱ्यावर फुलतात

 

झाडें,पाने,फुले,पक्षी

यांच्या सोबत गातो

कवितेचं बोट धरून

आभाळभर फिरतो

 

रसाळ त्या कविता

कोण लक्षात घेतो

हा मात्र तल्लीनपणे

मनापासून ऐकतो

 

खिडकीतला मुलगा

आज वर्गात आला नाही

माझा मराठीचा तास

म्हणावासा रंगला नाही

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =