You are currently viewing लेखणी प्रसवली कष्टाने

लेखणी प्रसवली कष्टाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लेखणी प्रसवली कष्टाने*

 

शब्द लिहिले कधी न कळले

वेदना झाल्या *कधीतरी*

पिढी बदलली शाई तीच

मुले म्हणाली *डोन्टवरी*

//1//

प्रवास झाला शहाऐंशी वर्षांचा

बोरूही आता थकला फार

दात पडले *काच दौतीचे*

झाले बहू तिचे *उपकार*

//2//

कधी सांडली कधी लवंडली

लिहिल्या कादंबऱ्या *छपन्न*

नसली छाती *जरी एवढी*

आज जेवतो *सुग्रास अन्न*

//3//

रहता बंगला छान चांगला

आकार आहे दौत लेखणी

पहाणाराही होतो अचंबीत

पाहून भव्य वास्तू *देखणी*

//4//

नाही प्रसवली फक्त अक्षरे

लक्ष्मी होती फिदा तीचेवर

ऐसी अक्षरे *लिहून सुंदर*

प्रचंड केले *प्रेम मजवर*

//5//

नाही काढला कधी ओरखडा

कधी न घासली *सहाणेवर*

संगणक आला जरी हातात

दसऱ्याला लिहितो अक्षरं चार

//6//

हात थरथरे अलीकडे आता

आग्रह केला *जनतेने*

म्हणून लिहिले *सन्मानपत्र*

*लेखणी प्रसवली कष्टाने*

//7//

 

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

93 24 32 41 57

प्रतिक्रिया व्यक्त करा