प्रश्न प्रेमातले

प्रश्न प्रेमातले

तू केलंस ता प्रेम,
तू लावलंस तो जीव,
मी जीव ओवाळून टाकलंय,
ता प्रेम नाय होता?

तू गाळलस ती दुका,
तुझे भरलेले ते डोळे,
माझ्या डोळ्यात डबडबलेली,
ती दुका नाय होती?

तू काढलस ते आठवणी,
तू दिलंस ते हुंदके,
माझा मन रडला तेच्यात
आठवणी नाय होते?

तू बघलंस ती सपना,
तू जागलस ते राती,
मी दिवसाढवळ्या बघलय,
ती सपना नाय होती?

तू जगलस ताच जीवन,
तू दिलंस तोच आनंद,
मी तुका हृदयात जपलय,
ता जीवन नाय होता?

(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा