सावंतवाडी आयटीआयमध्ये प्रवेश प्रक्रियेला 21 मे पासून सुरूवात
सिंधुदुर्गनगरी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी येथे विजेतंत्री, जोडारी, यांत्रिक मोटारगाडी, ड्रेस मेकिंग, कातारी, कोपा, आय.सी.टी.एस.एम., तारतंत्री, लाकूड काम तंत्रज्ञ या नऊ व्यवसायासाठी प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक 21 मे 2026 पासून सुरूवात होणार असल्याची माहिती सावंतवाडीचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य यांनी दिली आहे.
अर्ज भरण्याचे वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक व अधिक माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार दरमहा रूपये 500/- मात्र विद्यावेतन मिळणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी समकक्षतेची सुद्धा सोय आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळण्याची सोय आहे. लाभार्थ्यांनर त्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय भरणे या बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्यात. अधिक माहितीसाठी 8432695410, 7058485068 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन सावंतवाडीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य यांनी केले आहे.
