You are currently viewing पुराभिलेख विभागाचे माजी संचालक खराडे यांचे अल्प आजाराने निधन

पुराभिलेख विभागाचे माजी संचालक खराडे यांचे अल्प आजाराने निधन

मुंबई –

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागाचे माजी संचालक, अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अशोक कानू खराडे यांनी चेंबूर टिळकनगर या निवासस्थानी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते.इतिहासकालीन कागदपत्रांची जतन हे त्यांच्या कामांचे स्वरूप असले तरी त्यांच्या तील सामाजिक कार्यकर्ता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी शासकीय सेवेत आपल्या कामाला न्याय दिला.त्यात त्यांनी कसूर केली नाही. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक संपादन केले होते. गाबीत समाजातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रितपणे कार्य केल्याने विशेष मागासवर्गीय सवलत मिळू शकलो असे ते सांगत त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अनुसूचित जाती मध्ये समावेश होण्यासाठी एकसंघ होऊन प्रयत्न करूया असे सांगितले होते. पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. मुत्यु समयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अंकासाठी साहित्यिक लिखाण केले होते. तर विचारवंत कित्येक व्याख्यान मालेत पुष्प गुंफले होते. इतिहास शोधक म्हणून कामगिरी बजावली होती. अशोक खराडे हे मालवण देवबाग गावचे रहिवासी होते . त्यांच्या पश्चात प्रशांत, संतोष , दोन विवाहित मुली, जावई, पुतणे,दोन भाऊ, भावजया , असा परिवार आहे. काल संध्याकाळी चेंबूर चरईगाव हिंदू स्मशानभूमीत विद्युतदायीवर अत्यंत संस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रात मंडळी उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =