You are currently viewing रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत रॅली

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत रॅली

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत रॅली

कणकवली :

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली शहरात शनिवारी सायंकाळी रॅली काढण्यात आली. रॅलीचा प्रारंभ पटकीदेवी मंदिर येथून झाला. आप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान शहरातील व्यापारी, नागरिकांना नारायण राणे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

या रॅलीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे, राजश्री धुमाळे, भरत उबाळे, पंकज पेडणेकर, रवी सावंत, राजा पाटकर, विलास
जामसंडेकर, निखिल आचरेकर, संदीप नलावडे, मंदार कोदे, प्रियाली कोदे, महेंद्र अंधारी आदी सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा