You are currently viewing संवाद मीडिया दीपावली अंक २०२२….जागतिक साकव्य विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी, पुणे यांची बोलकी प्रतिक्रिया

संवाद मीडिया दीपावली अंक २०२२….जागतिक साकव्य विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी, पुणे यांची बोलकी प्रतिक्रिया

सावंतवाडीचे श्री दीपक पटेकर हे माझे फेसबुक वरील मित्र. अतिशय दर्जेदार कवितांतून त्यांची आणि माझी आधी भेट व मग फोनवर ओळख झाली. सावंतवाडी सारख्या अस्सल कोकणातील गावात ते राहतात. त्यांचा व्यावसाय ही कथा, कवितेहून खूप वेगळा आहे. पण काव्यप्रेम त्यांनी जपून ठेवलेय. नुकताच त्यांचा *संवाद मीडिया हा दिवाळी अंक २०२२* हातात आला असून. तो चांगला निघाला असल्याचे नमूद करताना मला आनंद होत आहे.
बहात्तर पानांचा हा दिवाळी अंक कथा, कविता, ललित लेख, वैचारिक लिखाण याने सजला आहे. लिहिणारे महाराष्ट्रातल्या दुरवरचा गावोगावचे जसे आहेत तसे परदेशातील ही आहेत. अनुभव कथन, सामाजिक समस्या, कथा असे विषयाचे वैविध्य आहे. अर्थात कवितानाही भरपूर स्थान आहे. त्यातही मुक्तछंद, गझल, वृत्तबध्द अशी रेलचेल आहे. अमेरिकेतून रसिका भांडारकर यांनी स्त्रीयांच्या वैवाहिक स्थानाबद्दल वेगळे विचार मांडलेत तर फोटो सेशन या लेखात भारती नाईक यांनी या विषयसंबंधी आपले रोचक अनुभव मांडलेत. अंक वाचून पूर्ण करतो तेव्हा एक चांगला दिवाळी अंक वाचल्याचे समाधान आपल्याला नक्कीच मिळते.
गुळगुळीत चांगल्या पेपरवर नेटकेपणाने अंक काढला आहे. मात्र विषयानुरूप मुद्दाम चित्रे काढून घेतल्याचे कुठे आढळले नाही. मुलांसाठी वेगळी पाने व मजकूर या पुढे ठेवायला हरकत नाही. अंकाचे हे दुसरे वर्ष आहे.

श्रीनिवास गडकरी
(रोहा) पुणे 9130861304

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =