You are currently viewing आंबोलीत थांबलेल्या इनोव्हाला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी…

आंबोलीत थांबलेल्या इनोव्हाला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी…

‌आंबोलीत थांबलेल्या इनोव्हाला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी…

आंबोली

उभ्या असलेल्या इनोव्हा कारला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिरण्यकेशी फाटा परिसरात घडली. सहदेव परब असे जखमीचे नाव आहे. त्यांना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर डॉ. महेश जाधव व अदिती पाटकर यांनी उपचार केले. समोरून येणाऱ्या गाडीची लाईट पडल्यामुळे चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे थांबलेल्या कारला त्यांची दुचाकी धडकली. याबाबत उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा