You are currently viewing आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात

आंगणेवाडी जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात

३.१५ वाजता दर्शन खुले ; कोरोना नियमांचे पालन करून साजरा होतोय श्री भराडी देवीचा जत्रोत्सव

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाला भाविकांच्या अलोट गर्दीत सुरुवात झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर होणाऱ्या या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याला भाविकांनी मध्यरात्री पासूनच गर्दी केली आहे. पहाटे ३.१५ वाजता देवीचे दर्शन सुरू झाले आहे.

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही जत्रा केवळ आंगणे कुटुंबीयांपूर्ती मर्यादित स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर आंगणेवाडीची जत्रा भाविकांच्या गर्दीत संपन्न होत आहे. जत्रेसाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी उपस्थिती दर्शविण्यात प्रारंभ केला. त्यानंतर सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास देवीच्या दर्शनाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. पहाटेच्या सत्रात मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती दर्शवली आहे. यात्रेकरूंची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहेत. कोरोनाचे नियम पाळून यात्रा उत्साहात सुरू झाली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, विनोद तावडे, आशिष शेलार, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह दिग्गज नेते मंडळीही जत्रोत्सवास भेट देणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा